Bhosari : कंपनीतून एक लाखांचे नट-बोल्ट चोरीला; कंत्राटी कामगार आणि वाहनचालकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतून पाच जणांनी मिळून एक लाख रुपये किमतीचे तयार नट-बोल्ट व कच्चे मटेरियल चोरून नेले. हा प्रकार जानेवारी ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत सिमंडसन मार्शल लिमिटेड या कंपनीत घडला. याबाबत कंपनीतील कंत्राटी कामगार आणि वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटी कामगार सचिन काळे, सागर करांडे, वाहन चालक रोहन पोखरकर, अविनाश जाधव, फिरोज (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमिला विशाल आंब्रे (वय 41, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कासारवाडी येथील सिमंडसन कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीतील पाच कंत्राटी कामगार आणि वाहनचालकांनी मिळून कंपनीतून एक लाख रुपये किमतीचे तयार नट बोल्ट आणि कच्चे मटेरियल चोरून नेले. हा प्रकार जानेवारी2019 ते 7 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.