Dehuroad : ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या एकाला मारहाण करून ठेवले डांबून

एमपीसी न्यूज – ढाब्यावर जेवण करण्यासाठी मैत्रीसोबत गेलेल्या एका व्यक्तीला चार जणांनी मिळून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे पैसे मागत त्याला हॉटेलच्या मागच्या खोलीत डांबून ठेवले. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेबाराच्या सुमारास रावेत येथील विसावा हॉटेलमध्ये घडली.

जितेंद्र दशरथ अडसूळे (वय 39, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र सोमवारी रात्री त्यांच्या एका मैत्रिणीसोबत रावेत येथील विसावा हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना चार अनोळखी आरोपी तिथे आले. त्यांनी जितेंद्र यांना विनाकारण शिवीगाळ करत रॉडने मारहाण केली. यामध्ये जितेंद्र यांच्या पाठीवर, हातावर, पायावर गंभीर दुखापत झाली. ‘तू माझे पैसे दिल्याशिवाय तुला सोडणार नाही’ असे म्हणून आरोपींनी जितेंद्र यांना हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत डांबून ठेवले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.