Alandi : शेड उभारण्यास विरोध; चौघांना मारहाण

एमपीसी न्यूज – शेड उभारण्यास विरोध केल्याने एकाच कुटूंबातील चौघांना चार जणांनी लोखंडी कोयता, पाईपने जबर मारहाण केली. ही घटना 31 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मेदनकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी तुफानसिंग श्रावण रजपूत, बिजलीबाई तुफानसिंग रजपूत, रवी तुफानसिंग रजपूत, अमरसिंग ऊर्फ गब्दुल पाटील, अमरसिंग ऊर्फ गब्दुल पाटील यांचा मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पबितर ऊर्फ बॉबी सुरेश राठोड (वय-25, रा. आळंदी फाटा, मेदनकरवाडी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड यांच्या घराशेजारी आरोपी तुफानसिंग रजपूत शेड उभारत होता. शेड उभारण्यास विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयता, पाईपने फिर्यादी, त्यांचा भाऊ रविंद्र, चुलतभाऊ जयसल,  आई सावित्रीबाई यांना मारहाण केली. रविंद्र यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली आहे.   आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.