Bhosari : तडीपार सराईत गुन्हेगार गजाआड

एमपीसी न्यूज – तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या सराईत गुन्हेगाराला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

स्वप्निल ऊर्फ बाळू नामदेव शेलार (वय 26, रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई करण नारायण विश्वासे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी स्वप्निल याला 26 ऑक्टोबर 2017 मध्ये दीड वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 10 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

फौजदार आर. बी. बांबळे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.