Pune : ऑर्बिटल इलेक्ट्रोमेक प्रतिष्ठेचा गो. स. पारखे इनोव्हेशन पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : उद्योगजगतात नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि गरुडझेप घेणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. यामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा गो. स. पारखे इनोव्हेशन पुरस्कार ऑर्बिटल इलेक्ट्रोमेक , व्हर्सा कंट्रोल्स, पाहवा मेटलटेक या कंपन्यांना जाहीर झाला आहे. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

नवीन उत्पादन व डिझाइनसाठी देण्यात येणारा हरि मालिनी जोशी पुरस्कार योगीराज गदो यांना जाहीर झाला आहे. अमाल्गम इंजिनीअरिंगच्या अमाल्गम बायोटेक या कंपनीला, तसेच डायनॅमिक इंजिनीअरिंग सोल्यूशन्स या कंपनीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईच्या पी. एन. सेफ्टी इंडस्ट्रीज या कंपनीलाही या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. महिला आंत्रप्रेनर्ससाठी दिला जाणारा रमाबाई जोशी पुरस्कार सरल प्री-कास्ट सोल्यूशन्स कंपनीच्या भागीदार संपदा वायचळ यांना जाहीर झाला आहे.

आज ( गुरुवार ) पुण्यातील पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगरू नितीन करमाळकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.