Chinchwad : चिंचवड येथे विडिओ फोटो ट्रेड फेअर पुणेचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुण्यातील प्रसिद्ध अशा (Chinchwad) आकाराव्या अॉल इंडिया विडिओ फोटो ट्रेड फेअरचे आयोजन येत्या 21 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे.

या विडिओ फोटो ट्रेड फेअरमध्ये लोकांना लाईव्ह डेमो, वर्क शॉप अनुभवता येणार आहेत. तसेच विविध दिग्गज छायाचित्रकारांनी काढलेले छायाचित्र पाहण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Chinchwad : बिजली नगर येथे इलेक्ट्रिक बाईकला लागली अचानक आग; बाईक जळून खाक

छायाचित्र स्पर्धा देखील या विडिओ फोटो ट्रेड फेअरमध्ये आयोजित करण्यात आली असून यामध्ये फॅशन शोचा देखील समावेश (Chinchwad) आहे. सुमारे 60 हजार स्केवर फुट जागेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी 8796676999 या क्रमांकावर नोंदणी करणे गरजेचे आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.