Maratha Reservation : श्रीक्षेत्र देहूगाव येथे रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन

एमपीसी न्यूज : श्रीक्षेत्र देहूगाव येथे सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने रविवारी ( दि. 19) मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकल मराठा समाज देहू पंचक्रोशीच्या वतीने याच दिवशी रात्री आठ वाजता प्रवेशद्वार कामानी जवळ सत्कार समारंभाचेही करण्यात आले आहे.

या सभेस जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देहू पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधवांना करण्यात आले आहे. याबाबतची नियोजनाची सभा देहूमध्ये नुकतीच पार पडली.

Chinchwad : चिंचवड येथे विडिओ फोटो ट्रेड फेअर पुणेचे आयोजन

या सभेला खेड (राजगुरुनगर) मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे, महाराष्ट्र राज्य क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, समन्वयक एडवोकेट निलेश आंधळे, शंकरराव राक्षे, एडवोकेट सुनील राक्षे, अंकुश काळे, अशोक मेदनकर, निवृत्ती नाईकरे, शुभम बालघरे, राकेश चव्हाण, सुदाम कराळे, अक्षय भगत, निलेश टाकळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देहू पंचक्रोशीतील प्रतिनिधी म्हणून नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, माजी सरपंच स्वप्निल काळोखे, (Maratha Reservation) एडवोकेट स्वप्नील काळोखे, गोरख काळोखे, गणेश हगवणे, ओंकार काळोखे, अजित काळोखे, सनी काळोखे, विवेक काळोखे, सचिन हगवणे, स्वप्निल हगवणे, निखिल पिंजण, सुदर्शन काळोखे व सर्व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.