Pune : मोठी बातमी! राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासून केली मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातून एक मोठी बातमी समोर (Pune) येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर लेखक नामदेव जाधव यांनी टीका केली होती. या रागातून आज जाधव यांच्यावर पुण्यात राष्ट्रवादीकडून तोंडाला काळे फसण्यात आले असून त्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. 

Maratha Reservation : श्रीक्षेत्र देहूगाव येथे रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन

आज नामदेव जाधव यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट येथे दिवाळी विशेष कार्यक्रम होता. सिंगापूरमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे असा हा कार्यक्रमाचा विषय होता. मात्र डेक्कन पोलिसांनी नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाची ही परवानगी  नाकारली होती. कारण राष्ट्रवादीकडून नामदेव जाधव यांना काळ फासण्याचा इशारा देण्यात आला होता.

शरद पवारांबद्दल आरक्षण मुद्द्यावर नामदेव जाधव यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या व्यक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून (Pune) सुरूच होता. कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने ते कार्यक्रमाला गेले नाहीत; मात्र एका ठिकाणी थांबले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा मागोवा घेत मोक्याचे क्षणी त्यांना मारहाण करत आणि तोंडाला काळे फासले.

एकीकडे नामदेव जाधव यांना काळे फसल्यानंतर राष्ट्रवादीचे भांडारकर इन्स्टिट्यूट बाहेर आंदोलन सुरूच असून नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरूच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.