Nashik News : विभागीय आयुक्त कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन

एमपीसी न्यूज :   विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड येथे सोमवारी ,8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे नाशिक विभाग नाशिक महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उप आयुक्त सुरेखा पाटील यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपिठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा तसेच महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या काही समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व त्यांना समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे आवाहन नाशिक विभाग नाशिक महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उप आयुक्त सुरेखा पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.