Oscar News : आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार

एमपीसी न्यूज- एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील (Oscar News)नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपट जगतात ऑस्कर हा  सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. या  पुरस्काराच्या नामांकनाची यादी काही महीन्यांपूर्वी जाहीर झाली होती. यात भारतीय चित्रपट आरआरआरच्या नाटू नाटू या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’  या प्रकारात नामांकन मिळाले होते. याच गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. देशभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होतो आहे.भारतीय चित्रपटासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

Oscar News : आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार

तेलुगू भाषेतील जे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे चंद्रबोस यांनी लिहिले असून राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांनी गायले आहे. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी या गाण्यावर नृत्य केले आहे. अॅकडमी थिटएरमध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला जगभरातील नामवंत कलावंत उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.