Pimpri News : शरद पवार यांच्यावर बोलण्याएवढी पडळकरांची लायकी नाही – विलास लांडे

एमपीसी न्यूज – आमदार गोपीचंद पडळकरांना लोकांनी निवडणुकीत नाकारले. ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना स्वतःची उंची मोजणे गरजेचे आहे. शरद पवार यांच्यावर बोलण्याएवढी पडळकरांची लायकी नाही. पडळकरांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला.

_MPC_DIR_MPU_II

विलास लांडे प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात असे म्हंटले आहे की, जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र पडळकर यांनी त्याआधी रात्री जाऊन चुकीच्या पद्धतीने उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने पडळकरांचे डोके ठिकाणावर नसल्याचा आरोप माजी आमदार लांडे यांनी पत्रकात केला आहे.

लांडे यांनी पत्रकात पुढे असे म्हंटले आहे की, बारामतीत डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकरांचा बोलवता धनी कोण आहे व कोणाच्या जीवावर ते एवढ्या उड्या मारताहेत, हे सगळ्यांना माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार शरद पवारांना गुरु मानतात. हे तरी पडळकरांनी ध्यानात घ्यावे आणि पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यावर अशोभनीय टीका करताना आपली पात्रता काय? हे पहिल्यांदा पडळकरांनी पहायला हवे होते, असा टोला लांडे यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.