Pakistan England Tour : पाकिस्तान क्रिकेट संघ लॉजवर, आर्थिक दिवाळखोरीमुळे संघावर आली ही वेळ 

This time the Pakistan cricket team staying In lodge insted of Hotels पाकिस्तान बोर्डावर सध्या ओढावलेलं आर्थिक संकट पाहता त्यांच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये लॉजवर राहण्याची वेळ आली आहे.

एमपीसी न्यूज – इंग्लंड-पाकिस्तानमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान 3 टी-20 आणि 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 1 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा संघ पहिल्या कसोटी सामन्याचे ठिकाण मँचेस्टरला पोहचेल. ऐरवी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर खेळाडूंच्या राहण्याची सोय फाईव्ह-स्टार हॉटेलमध्ये केली जाते, मात्र पाकिस्तान बोर्डावर (पीसीबी) सध्या ओढावलेलं आर्थिक संकट पाहता त्यांच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये लॉजवर राहण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानी क्रीडा पत्रकार साज सादीकने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. पाकिस्तानी पत्रकाराने खेळाडूंचे लॉजमध्ये दाखल होतानाचे फोटो शेअर केले आणि लिहिले, कोण म्हणत की जगभरातीलक्रिकेटर्स 5-स्टार हॉटेल्समध्ये लक्झरीचे जीवन जगतात. पुढील काही आठवडे पाकिस्तान क्रिकेट टीम डर्बी येथील ट्रॅव्हलॉजमध्ये थांबेल असे त्याने लिहले आहे.

कोरोनाच्या प्रभावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बोर्डाचा आपल्या मुख्य प्रायोजक असलेल्या पेप्सी कंपनीसोबतचा करारही संपुष्टात आल्यावर त्यांनी नवीन स्पॉन्सरशीपसाठी निवीदा मागवल्या होत्या. परंतू पेप्सी कंपनीचा अपवाद वगळता एकाही नवीन कंपनीने स्पॉन्सरशीपमध्ये आवड दर्शवली नाही, त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान टीम शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून खेळणार आहे.

प्रत्येक परदेश दौऱ्यात सर्व संघ पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात यंदा मात्र, पाक संघाला येथील एका सामान्य लॉजमध्ये राहावे लागत आहे. इतकेच नव्हे तर या मालिकेचे थेट प्रक्षेपणही संकटात सापडले आहे. प्रक्षेपण करत असलेल्या वाहिनीचेही पैसे मंडळाने अद्याप दिलेले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.