Talegaon: गोंधळलेल्या भाषणाबाबत पार्थ पवार म्हणतात…

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पहिल्याच जाहीर सभेतील भाषणामुळे सोशल मीडियावर चांगलेच ‘ट्रोल’ झाले होते. त्यांची खिल्ली उडविली जात होती. त्यावर आता पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

माजी मंत्री मदन बाफना आणि मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचा संयुक्त वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा आज (बुधवारी) वडगाव येथील भेगडे लॉन्स येथे पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार उपस्थित होते.

त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी गोंधळलेल्या भाषणाबाबत विचारले असता पार्थ पवार म्हणाले, ”माझे पहिलेच भाषण होते. एक-दोन चुका झाल्या आहेत. याचा असा अर्थ नाही की, मी त्यावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे. काय लोक भाषण करतात आणि काम काही करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो”.

दरम्यान, प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार यांच्यासमोर पार्थ यांनी तीन मिनिटांचे भाषण केले होते. भाषण वाचून दाखविता आले नव्हते. पार्थ पहिले भाषण करताना भांबावलेले दिसून आले. त्यावरुन सोशल मिडीयावर ते चांगलेच ‘ट्रोल’ झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.