Bye-Election : जगाची डिजिटल मिडियाकडे वाटचाल सुरु असताना डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले

एमपीसी न्यूज – जगाची डिजिटल मिडियाकडे वाटचाल सुरु असताना पुण्यातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या (Bye-Election) पोटनिवडणुकीसाठीच्या वार्तांकनास डिजिटल मिडियाला पासेस नाकारले आहेत. त्यामुळे डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत डिजिटल मिडिया इडिटर जर्नलिस्ट असोसिएशनचे शरद लोणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आता डिजिटल भारत सक्षम होत आहे. यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी पुण्यातील डिजिटल मिडियाला चांगले उत्तेजन आणि सहकार्य दिले आहे. त्यांच्यानंतर मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असे खेदाने नमूद करीत आहे.

Rising Starts : रायझिंग स्टारच्या चिमुरड्यांनी जिंकली मने

यापूर्वी झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीस डिजिटल मिडियाला मतदान, मतमोजणी संदर्भात तसेच वेळोवेळी शासकीय स्तरावरून, निवडणूक आयोगाच्या स्तरावरून  देण्यात येणारे पासेस देण्यात आलेले आहेत. आता कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होते आहे. या निवडणुकीतील मतदान, मतमोजणी पासेससाठी जिल्हा माहिती कार्यालयाने फोटो आणि पासेस मागविले होते.

तथापि, आज त्यांच्या कार्यालयातून डिजिटल मिडीयाला पासेस नाकारल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामागे काही कारण सांगण्यात आलेले नाही. डिजिटल मिडियाला आपण अशा प्रकारे अव्हेरू नये. हवे तर आवश्यक ते जरूर निकष लावावेत, मात्र डिजिटल मिडियाला वार्तांकनासाठी सहाय्य करावे.(Bye-Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित केलेल्या  डिजिटल इंडिया मधील डिजिटल मिडियाला भक्कम करण्यासाठी निराश करणार नाहीत, अशी अपेक्षा लोणकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.