Rising Starts : रायझिंग स्टारच्या चिमुरड्यांनी जिंकली मने

एमपीसी न्यूज –  द राइझिंग स्टार एज्युकेशन या पिंपळे गुरव येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी स्नेहसंमेलना निमित्त पिंपळे गुरव येथे निळू फुले नाट्यगृहात सोमवार,(दि.6)  रोजी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.(Rising Starts) ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, ह.भ.प. अशोक महाराज गोरे, प्रा. डॉ. बिरांची जेना, डॉ. विश्वास घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते अप्पा लोणकर आणि शाळेच्या संचालिका मनस्वी झोंबाडे यांनी केलेल्या सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

छोट्या विद्यार्थ्यांनी समूह स्वरात गणेश वंदना सादर केली. त्यानंतर महापुरुषांची वेषभूषा परिधान करून सभाधीट वक्तृत्वाचे नमुने पेश करीत मुलामुलींनी प्रबोधनात्मक संदेश दिले. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सादर केलेल्या प्रतीकात्मक नाटिकेला टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन अन् देशभक्तिपर समूह नृत्य गीतांनी प्रेक्षागृहातील वातावरण भारून टाकले; तर जुन्या अभिजात चित्रपटांमधील गीत नृत्यावर प्रेक्षकांनी ही ठेका धरला.

Pune News : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन

मुला मुलींच्या युगुल नृत्याने ‘वन्स मोअर’ मिळविला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पालक वडील आणि मुलगी तसेच आई अन् मुलगा या दोन समूहनृत्यांनी सर्वांना सद्गदित केले.(Rising Stars) पारंपरिक अन् पाश्चात्त्य वेषभूषा, सुरेल पार्श्वसंगीत, आकर्षक रोषणाई, नेटके निवेदन या पार्श्वभूमीवर चिमुरड्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानेश्वर झोंबाडे, प्रतीक झोंबाडे, शिक्षिका नंदा झाकडे, सोनाली शेवाळे, स्नेहा बोत्रे, वैभवी भालेराव, मदतनीस विमल ईबतवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.