Pune News : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन

एमपीसी न्यूज  –  महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्याधारित विद्यापीठ सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे तर्फे येत्या गुरुवारी (दि.9) सकाळी (Pune News) साडे अकरा वाजता विद्यापीठाच्या  मुख्य सभागृहात  तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

सिंबायोसिस  स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार  ह्यांच्या अध्येक्षतेखाली होत असलेल्या समारंभास  फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेश खत्री या दीक्षांत समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार, आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर, समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

या समारंभात 722 विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका आणि  विद्यापीठातर्फे घेण्यात येणारे विविध कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. ‘तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यास ’ कुलपती सुवर्णपदक देऊन गौरवण्यात  येणार आहे. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी, ‘आत्मनिर्भर पुरस्कार देणारे एसएसपीयु हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे.

Pune News : बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे पश्चिम क्षत्रिय कार्यालयाच्या वतीने ‘ग्राहक संपर्क अभियानांतर्गत सुमारे 70 कोटींचे  कर्ज वितरित

दरवर्षी विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या आणि स्वतःचा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यास हा पुरस्कार दिला जातो. त्याचप्रकारे विद्यापीठातील कौशल्ये आत्मसात करून यशस्वीपणे करिअर सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना दहावीनंतर दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे एसएसपीयु हे भारतातील प्रथम विद्यापीठ ठरले आहे. तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना एसएसपीयुतर्फे उमेद जागर या उपक्रमाद्वारे विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विधवा महिलांना या दीक्षांत समारंभात कौशल्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.