Pimpri News : शहरातील तलावांचे खोलीकरण, सुशोभिकरण करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक तलावांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा.(Pimpri News) त्याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करावे, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य असलेल्या तलावांची दुरावस्था झाली आहे. सर्वच तलावांमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचला असून, गवत आणि जलपर्णीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Lonavala News : साद प्रतिसाद 2023 दहावी राष्ट्रीय बौद्धिक विकलांग परिषद लोणावळा येथे संपन्न 

सध्यस्थितीला शहरात प्राधिकरण येथील गणेश तलाव, चिखली, भोसरी आणि बर्ड व्हॅली येथील तलावाची अवस्था दयनीय आहे. गेल्या काही वर्षांपासून या तलावांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. तलावांमध्ये प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जात नाही. (Pimpri News) अस्वच्छतेमुळे तलावातील पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

शहरातील तलाव हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. त्याकरिता तलावांमधील गाळ काढून खोलीकरण करावे. त्याद्वारे तलावांचे पुनरुज्जीवन करुन सुशोभीकरण करावे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मोकळा श्वास घेता येईल. (Pimpri News)पर्यावरण संधर्वन आणि नैसर्गिक जलस्त्रोत पुनरुज्जीवन करतानाच शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने तलाव सुधार प्रकल्प हाती घेणे संयुक्तिक ठरणार आहे. यावर सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार महेश लांडगे यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.