PCMC : आयुक्त, अतिरिक्त आयुक्त मॅच पाहण्यासाठी गहुंजेला; पालिकेत शुकशुकाट

एमपीसी न्यूज – महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, दोन अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त यांच्यासह काही वरिष्ठ (PCMC) अधिकारी दुपारून वर्ल्ड कपमधील क्रिकेट मॅच पाहण्यासाठी गहुंजे गेले होते. त्यामुळे दुपारपासून पालिकेत शुकशुकाट दिसून आला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये गुरूवारी भारत आणि बांगलादेश या दोन संघामध्ये क्रिकेट मॅच होत आहे. महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सामन्याची व्हीआयपी तिकिट मिळाली आहेत.

कामकाज सोडून दुपारून आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, उपायुक्त रविकिरण घोडके यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी क्रिकेट मॅच पाहण्यास गेले होते.

Talegaon Dabhade : जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

महापालिका वाऱ्यावर सोडून वरिष्ठ अधिकारी क्रिकेट मॅच पाहण्यास गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. वरिष्ठ अधिकारी (PCMC) नसल्याने दुपारपासून पालिकेत शुकशुकाट होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.