PCMC : महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (PCMC) पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तर निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची लातूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यात सलग तीन वर्षे काम केल्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसरीकडे बदली केली जाते. अधिकारी त्या जिल्ह्यातील असतील दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते.

Baramati : बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान – अजित पवार

उपजिल्हाधिकारी असलेले विठ्ठल जोशी यांची 4 एप्रिल 2022 मध्ये प्रतिनियुक्तीने महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती केली होती. क्रीडा, दक्षता व नियंत्रण, सामान्य प्रशासन विभागात चांगले काम केले. दोन वर्षानंतर त्यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय (PCMC)अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मूळ महसूल विभाग नागपूर असल्याने निवडणूक पदावर गडचिरोली येथे झाल्याचे जोशी यांनी सांगितले. तर, उपजिल्हाधिकारी असलेले निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची लातूर येथे बदली झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.