मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Divyang Seva Fortnight : दिव्यांग सेवा पंधरवड्यानिमित्त यूडीआयडी कार्डचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग सेवा पंधरवड्यानिमित्त ( Divyang Seva Fortnight) शहरातील दिव्यांग बांधवांना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते यूडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, दिव्यांग कक्ष अधिकारी बालाजी गित्ते, शरद फड आदी उपस्थित होते.

PCMC Worker Retirement : सह शहर अभियंता सतिश इंगळे यांच्यासह 24 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट म्हणाले, महापालिकेला आत्तापर्यंत ( Divyang Seva Fortnight) समाज कल्याण विभागाकडून महापालिकेला 1297 यूडीआयडी कार्ड मिळाले आहेत. यापैकी शुक्रवार अखेर 650 कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

Latest news
Related news