PCMC :  दस्तऐवज अद्ययावत करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित सर्व दस्तऐवज (अभिलेखे) अद्ययावत केले जाणार आहेत. त्यासाठी झीरो पेंडन्सी ऍण्ड डेली डिस्पोजल कार्यपद्धती रबविण्यात येणार आहे. (PCMC) त्याचा आढावा दरमहा घेतला जाणार आहे. त्याबाबतचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे.

महापालिकेच्या मुख्य कार्यालयात विविध विभाग आहेत. उद्यान, पशुवैद्यकीय, करसंकलन विभागाचे विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये व महापालिका दवाखाने व रुग्णालये वेगवेगळ्या भागात आहेत. या सर्व कार्यालयांतील अभिलेखे अद्ययावत केले जाणार आहेत. त्यासाठी सर्व अभिलेखांचे कायमस्वरूपी स्कॅनिंग व डिजिटायझेशन केले जाणार आहे.

Talegaon : किशोर आवारे यांच्या हत्येचा घटनाक्रम

त्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाला सूचना देण्यात आली आहे.(PCMC) मात्र, त्यानंतरी अभिलेखे करण्यासाठी विभागप्रमुखांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या कामकाजाचा मासिक आढावा घ्यावा, अभिलेखांचे वर्गीकरण व अद्ययावतीकरण करून उपाययोजना कराव्यात व त्याबाबतचा अहवाल सादर करावा.

सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील अभिलेखे सहा गठ्ठे पद्धतीने ठेवावेत.(PCMC) त्यांचे अ, ब, क, ड प्रमाणे वर्गीकरण करावे. ते ओळखू येण्यासाठी विविध रुमालांमध्ये बांधून अभिलेख कक्षामध्ये दाखल करावेत, असेही आयुक्त सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.