Chakan : चाकणमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज :  महात्मा ज्योतिबा फुले व (Chakan) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ चाकण (ता. खेड ) महात्मा फुले मार्केटच्या समोर करण्यात आला.

खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिलीप मोहिते यांच्या शुभहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार अॅड. राम कांडगे म्हणाले कि, महाराष्ट्रात क्वचितच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित पुतळे आहे. चाकण मध्ये या एकत्रित पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरु होत आहे. समाजातील सर्व लहान थोर व्यक्तींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे देणगी दिल्याने या कामास गती मिळाली. (Chakan) या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असल्याचे देखील मा.आ. कांडगे यावेळी म्हणाले.

PCMC :  दस्तऐवज अद्ययावत करणार

आमदार दिलीप मोहिते यावेळी म्हणाले कि, या पुतळ्याच्या परवानग्या शासन स्तरावरून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असून पुढील काळात येथे पुतळा उभा राहण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. पुतळा उभा राहिल्यानंतर त्यांची देखभाल खेड बाजार समितीकडून करण्यात येणार आहे.

यावेळी खेड  बाजार समितीच्या सर्व नूतन संचालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे अध्यक्ष विनायक घुमटकर,  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, शांताराम घुमटकर, तुकाराम कांडगे, क्रांती सोमवंशी, अनिकेत केदारी आदींनी विचार व्यक्त केले.(Chakan) यावेळी चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, स्नेहा जगताप, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई गोतारणे यांच्यासह बाजार समितीचे सर्व नूतन संचालक, चाकणचे माजी नगरसेवक, यांच्यासह सर्वपक्षीय अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.