Bopkhel News : इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत महापालिकेची बोपखेल शाळा तृतीय स्थानी

एमपीसी न्यूज : समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल इंग्लंडमधील टी फॉर एज्युकेशन संस्था जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कार देण्यात येत असून त्यातील ‘समुदाय सहयोग’ (कम्युनिटी कोलॅबोरेशन) श्रेणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले आहे.(Bopkhel News) या संस्थेतर्फे अडीच लाख अमेरिकन डॉलर बक्षिस म्हणून देण्यात येणार असून, पहिल्या पाच शाळांमध्ये ते विभागून दिले जाणार आहे.

‘पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल’ या शाळेत 316 विद्यार्थी आणि 25 शिक्षक आहेत. महापालिकेने ही शाळा आकांक्षा फाउंडेशनला चालवायला दिली आहे.तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदीने वेढलेले गाव म्हणजे पिंपरी-चिंचवडचे बोपखेल उपनगर आहे.(Bopkhel news) गावठाण, वाड्या, वस्त्या अशी रचना असून त्यात दापोडीला जोडणारा रस्ता सात वर्षांपूर्वी लष्कराने बंद केलेला. अशी अडचणीची स्थिती असल्याने गावातील महापालिकेच्या शाळेऐवजी खासगी शाळेकडे पालकांचा ओढा. मात्र, येण्या-जाण्याची गैरसोय.

RTI Day : माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

त्यावर उपाय म्हणून स्थानिक स्तरावरच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, महापालिकेच्या शाळेत पालकांनी मुलांना दाखल करावे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल उचलले.(Bopkhel news) आकांक्षा फाउंडेशनला शाळा चालवायला दिली. त्यांनी इंग्रजी माध्यमातून धडे द्यायला सुरवात केली. सर्व सुविधा मुलांना मिळू लागल्या. गुणवत्ता वाढली आणि अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत शाळेचा अर्थात ‘पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल’चा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचला.

शाळेची वैशिष्ट्ये!

बोपखेलमधील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टीतील विद्यार्थी
ज्युनिअर केजीपासून दहावीपर्यंतचे वर्ग
मुलांना मोफत प्रवेश
मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, दरमहा बैठक
पालक, विद्यार्थी, समाजासाठी आरोग्य जागृती शिबिरे
शाळा व्यवस्थापन, विद्या, परिवहन, पोषण आहार समित्यांमध्ये पालकांचा सहभाग

मुख्याध्यापिका सुषमा पठारे म्हणाल्या, “स्पर्धेच्या ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ विभागात आम्ही सहभाग घेतला. पालकांसोबत आम्ही काम करतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवितो. त्यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.