PCMC : नोकर भरती! आरोग्य निरीक्षकाच्या 13 जागांसाठी दिली 1187 जणांनी परीक्षा

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध (PCMC) विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 388 जागांसाठीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज आरोग्य निरीक्षक पदासाठीच्या 13 जागांसाठी झालेल्या परीक्षेत 1 हजार 939 पैकी 1 हजार 187  परीक्षार्थींची उपस्थिती होती. त्याचे प्रमाण 61 टक्के होते. तर, 752 जण परीक्षार्थी गैरहजर राहिले.

महापालिकेतील पाच हजारहून अधिक रिक्त जागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनंतर नोकर भरती सुरु झाली आहे. 15 पदांसाठी 26, 27 आणि 28 अशा तीन दिवस राज्यातील 26 जिल्ह्यातील 98 केंद्रांवर परीक्षा होत आहे.

MPC News Special : डिजी लॉकरमधील कागदपत्रे वैध; मूळ कागदपत्रांसाठी आग्रह नको

शुक्रवारी आरोग्य निरीक्षक पदासाठी झालेल्या परिक्षेसाठी (PCMC) राज्यभरातून 1 हजार 939 जणांनी अर्ज भरले होते. मात्र, यामधील 1 हजार 187 जणच परिक्षेसाठी उपस्थित होते. 752 जण गैरहजर होते.

 आरोग्य निरीक्षक पदाची परीक्षा आज पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शनिवारी, रविवारी तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.