PCMC : रखडलेली कामे नवीन वर्षात मार्गी लावण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्धार

एमपीसी न्यूज – नवीन वर्षात नागरिकांच्या (PCMC) दृष्टीने महापालिका विवध सोयी सुविधा प्रत्यक्ष सुरू करण्यास कटिबद्ध आहे. उत्तम दर्जाचे रस्ते तयार करणे हे पालिकेचे उदिष्ट आहे. 2023 या वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील अर्धवट, रखडलेली कामे मार्गी लावण्याचा निर्धार महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला आहे.

आयुक्त सिंह म्हणतात, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बी आर टी एस रस्ता निर्मिती, बोपखेल येथील पूल निर्मिती
पिंपरी डेअरी फार्म – पूल निर्मिती, स्पाईन रोड मधील मिसिंग लिंक (राहिलेले टप्पे) कामे पूर्ण करण्याबरोबरच शहर सुशोभीकरणावर भर देणे, स्वच्छता अभियानावर भर देणे, हे देखील उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याबरोबरच काही नवीन योजना व प्रकल्प राबविण्याचे व चालू योजना व प्रकल्पांची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन केले आहे.

नवी दिशा व शून्य कचरा स्लम प्रकल्प, मुख्य रस्ते यांत्रिकी मशिनद्वारे स्वच्छता काम सुरू करणे. मोशी बायोमायनिंग प्रकल्प तसेच हॉटेल वेस्ट पासून गॅस निर्मिती प्रकल्प तसेच वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अंतर्गत 14 MW क्षमता प्रकल्प सुरू करणे, शिक्षणाचा जल्लोष या अभियानाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देणे.

पार्किंग सुविधा वाढ व ट्राफिक समस्येवर (PCMC) उपाययोजना करणे. नागरिकांना चांगल्या पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देऊन त्यासाठी जिजाऊ क्लिनिक्सची निर्मिती करणे. मासुळकर नेत्र रुग्णालय सुरू करणे. सर्व रुग्णालयांत दंत रोग विभाग स्थापन करणे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून शहराला अतिरिक्त 100 एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध करून देऊन शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

PMAY योजनेद्वारे गोर गरीबांना नागरिकांना घरे उपलब्ध करून देणे, YCM नर्सिंग कॉलेज सुरू करणे. स्टेट ऑफ आर्ट मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करणे, यशदाच्या सहकार्यने सुसज्ज UPSC MPSC मार्गदर्शन केंद्र सुरू करणे. शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्ग सुशोभीकरण तसेच अर्बन स्केपिंग प्रकल्प पूर्ण करणे, नदी सुधार प्रकल्प पहिल्या टप्प्यातील मुळा नदी सुधारणा कामे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तसेच, राज्य शासन व SPV (Special Purpose vehichle )द्वारे पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पूर्ण करणे, शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करणे, सर्व शहरातील CCTV प्रणाली सुरक्षितता दृष्टीने पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे.

Resident Doctor Strike : आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.