koregaon Bhima : कोरेगाव भीमासंदर्भात 100 हून अधिक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट

एमपीसी न्यूज : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर (Koregaon Bhima Social Media) पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 100 हून अधिक सोशल मीडिया पोस्ट शोधून काढल्या आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अंकित गोयल यांनी दिली आहे. सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि मॉनिटरिंगचा भाग म्हणून आम्ही कोरेगाव-भीमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व सोशल मीडिया पोस्ट चेक करण्याल आल्या आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने 100 हून अधिक पोस्ट आम्ही शोधल्या आहेत. यासंदर्भातील सगळी माहिती संबंधित पोलिस स्टेशनला दिली आहे आणि अशा पोस्ट डिलीट करण्याची तातडीने कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सोशल मीडिया हँडलवर अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात नोटीस जारी केली आहे आणि त्यांना अशा पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचंही गोयल यांनी सांगितली. सोशल मीडिया आणि मेसेंजर अॅप्सवर कोणतीही खोटी, बदनामीकारक किंवा सांप्रदायिक फूट पाडणारी माहिती किंवा मेसेज पाठवल्यास ग्रुप अॅडमिन आणि असे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार (Koregaon Bhima) आहे आणि त्या लोकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.

Resident Doctor Strike : आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.