Resident Doctor Strike : आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर!

एमपीसी न्यूज : आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर (Resident Doctor Strike) संपवार जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने हा संप पुकारला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून शासकीय व पालिका महाविद्यालयात त्यांचे निदर्शन सुरु होणार आहे. या संपाने मात्र रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्या दुर्लक्ष केल्या. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात येत आहे.

 

निवासी डॉक्टरांच्या मागण्या – Resident Doctor Strike

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होते.

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती याचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडल्याने निवासी डॉक्टरांचे भविष्यही रखडले आहे.

सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे. यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार?

शासन निर्णयानुसार 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा.

सध्या महाराष्ट्रातील वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरीष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वरीष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा.

Today’s Horoscope 2 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.