PCMC : लोखंडी खिळा अडकल्यामुळे लिफ्ट पडली बंद 

एमपीसी न्यूज – लोखंडी खिळा अडकल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील लिफ्ट बंद पडल्याने सहा जण लिफ्टमध्ये अडकले होते. (PCMC) अर्धा तासानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्यां नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. ही घटना आज (बुधवारी) पावणे एकच्या सुमारास घडली.

मुंबई-पुणे महार्गावर पिंपरी येथे महापालिकेचे चार मजल्यांचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात विविध कामासाठी शहराच्या विविध भागातून नागरिक येत असतात. महापालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी एक स्वतंत्र लिफ्ट आहे. तर कर्मचारी आणि नागरिकांसाठी तीन स्वतंत्र लिफ्ट आहेत. यामधील एक लिफ्ट ना दुरूस्त झाल्याने त्या ठिकाणी नवीन लिफ्ट बसविण्यात आले होते. ही लिफ्ट 1 मे रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. बुधवारी दुपारी नागरिक आणि महापालिका कर्मचारी असे सहा जण या लिफ्टने दुसरा, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर जात होते.

PCMC : थेरगाव, जिजामाता, तालेरा रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

अचानकच लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर बंद पडली. लिफ्ट मध्येच बंद पडल्याने सहा जण चांगलेच घाबरले. लिफ्ट वरती किंवा खाली जात नसल्याने सहाही जण घामाने डबडबून गेले. (PCMC) लिफ्ट बंद पडल्याची माहिती मिळताच इतर लिफ्टमधील कर्मचारी व विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. कर्मचा-यांना लिफ्ट उघडण्यात अर्ध्या तासाने यश आले. त्यानंतर कर्मचारी, नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.