PCMC : थेरगाव, जिजामाता, तालेरा रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

एमपीसी न्यूज – प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम- लक्ष्य  या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) आणि  नवीन जिजामाता रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळाले आहे. (PCMC) या प्रमाणपत्राच्या आधारावर या रुग्णालयांना केंद्र शासन स्तरावरील राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (NQAS) गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता प्रयत्न करण्याची तयारी चालू आहे.

केंद्र शासनाव्दारे “ प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम- लक्ष्य ” राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयामधील प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याचा मानस आहे. जेणेकरुन गरोदर माता, प्रसुत माता व नवजात शिशु यांना मिळणा-या सेवांचा दर्जा सुधारता येईल. प्रसूतीचा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव प्रत्येक गर्भवती महिलेला मिळावा अशी तिची आणि तिच्या कुटुंबाची इच्छा असते. यासाठी देशातील मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लक्ष्य हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.

जिजामाता रूग्णालय

Chikhali : एसटीपीचे काम बंद करा, अन्यथा न्यायालयात जाणार

सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये इत्यादी रुग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी. तसेच प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक आणि उच्च दर्जाची मातृत्व काळजी प्रदान केली जावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागामधील गुणवत्ता वाढ तसेच मातांना सुरक्षित प्रसुती आणि मातृत्वाचा आनंद घेता यावा यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेसाठी केंद्र शासनाच्या लक्ष्य या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील (PCMC) प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला केंद्रस्तरीय पथकाने निरिक्षण केल्यानंतर केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (NQAS) गुणवत्ता प्रमाणपत्र मागील वर्षीच प्राप्त झालेले आहे. तसेच कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल आकुर्डी रुग्णालयांचे देखील केंद्रशासनाच्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (NQAS) गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी केंद्रस्तरीय पथकाव्दारे मार्च 2023 मध्ये निरिक्षण करण्यात आलेले असून त्याचा निकाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

तालेरा रूग्णालय

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.