PCMC : ‘त्या’ सूचनांचाच होणार अंदाजपत्रकात समावेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या( PCMC) वतीने सन 2024-25 वर्षांचे ( PCMC)अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी शुक्रवार (दि.10) पर्यंत आपल्या सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालय पाठवाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे. मुदतीत आलेल्या सूचनांचाच अंदाजपत्रकात समावेश केला जाणार असल्याचे लेखा विभागाने सांगितले.

नागरिकांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रभागातील कामे सुचवावीत. नागरिक नागरी सुविधेसंदर्भातील कामे सुचवू शकतात. स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य व इतर विभागाची कामे नागरिक सांगू शकतात. तसेच नाविन्यपूर्ण कल्पनेचे कामही सुचविता येते. या सूचना नागरिकांना 10 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येतील. योग्य सुचनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे.

Alandi : प्रा. प्रकाश राऊत यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान

नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाच्या मेलवर आपल्या नाव व संपर्क क्रमांकास सूचना पाठव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या सूचना तपासण्यात येणार आहे. त्यातील योग्य सुचनांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात येईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2023-24 चे सुधारित आणि 2024-25 चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्याचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी अंदाजपत्रकीय आकडेवारी तत्काळ लेखा विभागाकडे सादर करावी. भांडवली आणि महसूली खर्चाचा उल्लेख करावा.

विभाग प्रमुखांनीही 10 नोव्हेंबरपर्यंत माहिती द्यावी, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. विभाग प्रमुखांकडून सर्व माहिती आल्यानंतर त्यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी ( PCMC) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.