PCMC Police: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेतील पोलीसांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी, अंमलदार व वॉर्डन यांचे आरोग्य तपासणी शिबीर आज घेण्यात आले. (PCMC Police) हे शिबीर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिष माने यांचे मार्गदर्शनाखाली डॉ डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व  सिप्ला कंपनी तर्फे  दुपारी 2  ते सायंकाळी 5 यावेळेत  पिंपरी वाहतूक विभाग येथे घेण्यात आले.

 

 

CM Eknath Shinde : मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे

 

डॉ डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रा. सचिन डोळे, डॉ सुवर्णा कळली, डॉ रॉबिन भट्टी, डॉ रिया गांधी, डॉ अरुण बालन व सिप्ला कंपनीचे प्रमोद आष्टीकर, अभिजित शिंदे यांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. तत्पूर्वी पोलीस निरीक्षक दिपक साळुंके, नियोजन वाहतूक विभाग व सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पिंपरी व चिंचवड वाहतूक विभाग यांनी पथकाचे स्वागत केले. (PCMC News) आरोग्य (फुफुस) तपासणी शिबिरात पिंपरी वाहतूक विभागाचे एकूण 16 अंमलदार व 22 वॉर्डन तसेच चिंचवड वाहतूक विभागाचे एकूण 14 अंमलदार व 20 वॉर्डन यांची तपासणी करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.