CM Eknath Shinde : मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

PMC News: पुणे महापालिके विरुद्धची तक्रार अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाने फेटाळली

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. देवस्थान परिसराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

दर्शन घेतल्यानंतर (CM Eknath Shinde) श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी येथील मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी विश्वस्त तुषार शहाणे, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदीप जगताप, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.