Nagpanchami: नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

एमपीसी न्यूज : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात मंगळवारी (दि. 2) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Nagpanchami)नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हाऱ्याजवळ नाग-नरसोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात येते. नागपंचमीला अनंत,वासुकी, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया, शंखपाल, पद्मक, कर्काेटक या नऊ नागांच्या पुजनाला विशेष महत्त्व असल्याने पूजा करताना भाविकांकडून प्रार्थनेतून या नवनागांचा उल्लेख करण्यात येतो. यावेळी घरोघरी नाग-नरसोबा या देवतेला लाह्या, दूध, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

 

आळंदीत प्रथा परंपरे नुसार नगरपालिका चौकात नागदेवतेच्या मूर्ती चे पूजन होऊन त्या नागदेवतेच्या मूर्तीस मंदिरात आणले जाते. मंदिरात सकाळ पासून या नागदेवतेच्या पूजनासाठी महिला येतात. प्रथम आळंदीतील स्थानिक मानकरी (कुऱ्हाडे, चिताळकर ,घुंडरे)या महिलांकडून या नागदेवतेचे पूजन होते.आळंदी ग्रामीण भागाच्या परिसरातील महिलांनी झाडाला दोर बांधून झोके तयार करून झोक्याच्या खेळाचा आनंद लुटला. मंदिरात विशेषतः सायंकाळी नागपूजेसाठी मोठ्या प्रमाणात महिला जमतात.नागपूजन झाल्यानंतर त्या मंदिरात फुगड्या घालतात.

 

Bhosari News: भोसरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. (Nagpanchami) या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.