Bhosari News: भोसरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज: स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक कवी, प्रभोदनकार व समाज सुधारक, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बालाजी नगर येथील महिलां तर्फे साडी वाटप करण्यात आले. (Bhosari News) यावेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जावेद सौदागर व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार भाई शेख यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ला पुष्पहार घालण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.(Bhosari News) यावेळी महिलां तर्फे अनिता वैरागळ यांनी सर्व कार्यक्रम आयोजित केला होता. अनिता वैरागळ,भीमाबाई ढवळे,मथुरा बाई उपाडे ,जनाबाई शिंदे, राधाबाई पाटोळे, लक्ष्मी उपाडे ,वंदना थोरात ,सुनीता ढवळे,पद्मिनी बाई वाघमारे ,लक्ष्मी दोनघव ,जयश्री ढवळे ,शांताबाई उमाप ,सुनीता वाघमारे ,नंदिनी पाटोळे , कोमल उमाप , गौरी आटोटे , सुनीता आठवले,मंगल कांबळे, मंदा बागाव या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

 

वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार भाई शेख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी वेल्फेअर पार्टी चे पुणे जिल्हा अध्यक्ष जावेद सौदागर, उपाध्यक्ष अमिल सैफी, सरदार पठाण ,लायक अली शेख, फिरोज तांबोळी , साबीर शेख, विनोद ढवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.