Uday Samant : उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे शिवसैनिकांचा हल्ला

एमपीसी न्यूज : माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर कात्रज येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेरले होते. त्यांच्या गाडीवर दगड मारून त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. त्यामुळे गाडीतील एका व्यक्तीला दुखापत देखील झाल्याचे समोर आले आहे.

PCMC Police: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेतील पोलीसांची आरोग्य तपासणी

आजच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधला. तसेच पुणे पोलिस आयुक्तांनी सामंत यांच्याशी संवाद साधला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दिली. हल्ल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल त्यांनी पोलिसांना सामंत यांनी धन्यवाद दिले. मात्र या हल्ल्याबद्दल (Uday Samant) कोणावर त्यांनी संशय व्यक्त केला नाही. पण कोणी चिथावणी दिली असेल तर त्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.