PCMC  School :   महापालिकेच्या शाळांच्या ग्रंथालयासाठी 1 लाख पुस्तके

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC  School) शिक्षण विभागाच्या वतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, यासाठी स्वतंत्र ग्रंथालय उभारण्यात येणार आहेत. या ग्रंथालयासाठी 99 हजार पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 70 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.

Maharashtra News : मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयात इंटर्नशिपची संधी

शहरात महापालिकेच्या 105 प्राथमिक, 18 माध्यमिक यासह उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शाळेमध्ये एक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये अवांतर वाचनाची इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तके ठेवण्यात येणार आहे.

या पुस्तकांची खरेदीसाठी भांडार विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये चार ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चिंचवडच्या प्रिसाईज एंटरप्रायजेसने सर्वात कमी दराची निविदा सादर केली. त्यास तुलानात्मकदृष्ट्‌या हा दर वाजवी असल्याने त्यांची निविदा स्वीकारण्यात आली. त्यानुसार, इंग्रजी व हिंदी पुस्तके अशी एकूण 99 हजार पुस्तके खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 69 लाख 38 हजार 624 रुपये खर्चास आयुक्त सिंह यांनी मान्यता (PCMC  School) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.