PCMC : शेखर सिंह आयुक्त नव्हे भाजपचे कार्यकर्ते – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीवरुन ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात असे दिसते. (PCMC) शेखर सिंह आयुक्त नव्हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. दरम्यान, आयुक्त सिंह यांनी याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. जॅकवेल निविदेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

भामा आसखेड धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे, त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, अॅप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत यांत्रिकी, स्काडासह इतर अनुषंगिक कामाची निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. पण, आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, जॅकवेलच्या निविदेतील त्रुटी, त्याबाबतचे पुरावे दिले. मध्यप्रदेश, नागपूर येथे निलंबित झालेल्या ठेकेदार कंपनीला हे काम देण्यात येते. अशा ठेकेदाराला पाणीपुरवठ्याचे महत्वाचे काम देण्याचा प्रयत्न करत आहे. (PCMC) भाजपच्या दबावाखाली चुकीच्या ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. आम्ही दिलेल्या पुराव्यांनुसार सुनावणी घेणे अपेक्षित होते. पण, प्रशासनाने घेतली नाही. आयुक्त त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.

Akurdi : शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञान वापरा –  प्रवीण तरडे

शहराचे माजी पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झालेल्या दिवशी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या दबावाखाली प्रशासनाने हा चुकीचा निर्णय घेतला. या निविदेत स्पर्धा झाली नसून आणखी स्पर्धा झाली असती असे आयुक्तांनी मान्य केले. एका दिवसात ठेकेदाराने 17कोटी रुपये कमी केले आहेत. भाजपच्या लोकांना भेटल्याशिवाय ठेका भरता येत नाही, अशी परिस्थिती आहे. शेखर सिंह आयुक्त नव्हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यासारखे ते काम करतात. ज्या पद्धतीने ते निर्णय घेतात. त्यावरुन तसेच दिसते.

महापालिकेत अनेक आयुक्त पाहिले. पण, चुकीच्या कामासंदर्भात विरोधी पक्षाच्या लोकांनी काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. तर, आयुक्त महापालिका, शहरातील नागरिकांच्या (PCMC) हिताचा निर्णय घेत होते. परंतु, आत्ताचे आयुक्त महापालिकेच्या हिताचा विचार न करता केवळ भाजपच्या हिताचा विचार करतात असे दिसत आहे. येत्या काही दिवसात निविदे विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही गव्हाणे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.