Talegaon : जुना पुणे-मुंबई महामार्गावर लिंब फाटा येथे अपघात प्रतिबंध उपाययोजना

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Talegaon)वतीने सेव्ह लाईफ फाउंडेशनने अपघात प्रतिबंध उपाययोजना केल्या. याबाबत तळेगाव वाहतूक विभागाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. अपघात प्रतिबंध उपाययोजना केल्यामुळे सुरक्षित रस्ते प्रवास करता येणार आहे.

Pimple Saudagar News: पाणी समस्या लवकरच सुटणार, 20 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण – नाना काटे

लिंब फाटा येथे सेफ्टी बॅरियर्स, चॅनेलायझर बसवले आहेत. दिशादर्शक, स्पीडलिमिट, स्पीड ब्रेक रमलर्स, नो ओव्हरटेकिंग असे अनेक रोड सेफ्टी बोर्ड रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्या मुरूम टाकून भरल्या आल्या आहेत.

रस्त्याच्या दोन्ही मार्गांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे थर्मल रमलर्स पट्टे, पादचाऱ्यांना रोड क्रॉस करण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात आले आहेत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी उपयोगी पडणारे ब्लींकर दुरुस्त करून (Talegaon)बदलण्यात आले आहेत.

लिंब फाट्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. लिंब फाटा येथून महामार्ग ओलांडून तळेगावात जाण्यासाठी तसेच वडगावच्या दिशेने जाण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाहन चालकांना सुरळीत प्रवास करणे व अपघातास प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. या चौकात उंचीवरील दिवे लावण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे.

तळेगाव वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजमल आणि एमएसआरटीसीच्या उप अभियंता प्रेरणा कोटकर यांनी या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.