PCMC: निगडीतील जलशुद्धीकरण केंद्र खाजगी तत्वावर चालविणार, स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC ) सेक्टर 23 निगडी शुद्धीकरण केंद्र खाजगीकरणाने चालविण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत टप्पा क्रमांक 1 ते 4 व केमिकल हाऊस खाजगी तत्वाने चालविण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले अकादमी (एसपीए) साठी निवड झालेल्या विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी यांना दरमहा द्यावयाची विद्यावेतनची रक्कम अटी व शर्ती निश्चित करून देणे, 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी. टी. गणवेश आणि स्वेटर खरेदी करणे, ‘ब’ कार्यक्षेत्रातील महिला बचत गट, महिला मंडळांना प्रभागनिहाय सार्वजनिक स्वच्छतागृहाची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची कामे देणे, प्रभाग क्रमांक 18 मधील केशवनगर, चिंचवडगाव व इतर परिसरातील रस्ते व इतर रस्ते आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येणार आहे.

 

Hinjawadi Crime : किरकोळ कारणावरून तरुणाला बॅटने बेदम मारहाण

‘ड’ गटातील वाहनांच्या व वाहनांवरील हायड्रोलिक यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी एजन्सी निश्चित करणे, पीजीआय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयांच्या दैनंदिन साफसफाईसाठी अकुशल संवर्गातील कर्मचारी नियुक्त करणे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 24 व 27, प्रभाग क्रमांक 2 व 8 तसेच तळवडे गायरान येथील विविध उद्याने देखभाल करण्याच्या कामाला मान्यता देण्यात (PCMC )आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.