Pimpri : साखरपुडा झाल्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज  – तरुणीसोबत साखरपुडा करून तिला (Pimpri) ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शेअर मार्केटसाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी तरुणीला कर्ज काढण्यास भाग पाडले. तरुणीकडून सव्वापाच लाख रुपये घेऊन तिच्याशी भांडण करत लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार एप्रिल ते जून 2022 या कालावधीत पिंपरी, महाबळेश्वर, नानापेठ पुणे येथे घडला.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंजपेठ पुणे येथील बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

PCMC: निगडीतील जलशुद्धीकरण केंद्र खाजगी तत्वावर चालविणार, स्थायीची मान्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीसोबत एप्रिल 2022 मध्ये साखरपुडा केला. त्यांनतर फिर्यादीला महाबळेश्वर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वेळोवेळी ठिकठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले. आरोपीच्या वडिलांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर मार्केट साठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी फिर्यादीला कर्ज काढण्यास भाग पाडले.

फिर्यादीकडून आरोपींनी पाच लाख 22 हजार रुपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली. तसेच फिर्यादीवर संशय घेऊन तिच्याशी लग्न करणे टाळले. पैसे मागायला आली तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे (Pimpri)  फिर्यादीत म्हटल आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.