PCMC : एमआयडीसीतील ‘मिक्स’ कचरा उद्यापासून उचलणार नाही – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका एमआयडीसीतील कचरा उचलत आहे. पण, आजपासून एमआयडीसी परिसरातील एकत्रित कचरा उचलणार नाही. (PCMC) कचरा विलगीकरण करून न दिल्यास 500 पासून 50 हजारापर्यंत दंड आकारणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते. महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जात आहे. कचरा विलगीकरण झाले नाही, तर 1 एप्रिलपासून कचरा उलचणार नाही. पहिल्या टप्प्यात एमआयडीसीत त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Bullock cart race : सांगलीत रंगणार भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार

शहरातील सर्वच नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र द्यावा. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी जनजागृती, सोसायटीधारकांशी, एमआयडीसीमधील उद्योजकांशी बैठक घेतली आहे.(PCMC) त्यांना ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार उद्यापासून पहिल्या टप्प्यात एमआयडीसी भागातील ओला व सुका असा स्वतंत्र कचरा देणाऱ्यांचाच कचरा स्वीकारला जाणार नसल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.