Pune News : देहू आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यात 100 लोकांना परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

एमपीसी न्यूज : देहू आळंदी पालखी सोहळा सोहळ्यासाठी प्रस्थान सोहळ्यात 100 लोकांना परवानगी तर उर्वरित आठ मानाच्या पालख्यांसाठी पन्नास लोकांना परवानगी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पालखी वारीसाठी दहा मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन बसेस देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी एक बस देण्यात आली होती. वाखारीपासून पंढरपूरपर्यंत दीड किलोमीटर अंतरावर मर्यादित वारकऱ्यांचा उपस्थित पायी परवानगी देण्यात अली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.