दसऱ्याच्या दिवशी खुशखबर ! पेट्रोल , डिझेलच्या दरात घट

एमपीसी न्यूज : इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी काही नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच गोष्ट झाली आहे. मात्र आज दसऱ्याच्या दिवशी नागरिकांसाठी खुशखबर असून पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. डिझेलच्या दरातदेखील आज घट झाली आहे. डिझेलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात केली होती. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढतेच राहिले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर नव्वद रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.