Pimpale Saudagar : इंग्लंड वरून भेटवस्तू पाठविल्याच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मेट्रोमोनियल साईट वरून ओळख झालेल्या (Pimpale Saudagar) एकाने महिलेला इंग्लंड वरून भेटवस्तू पाठवल्याचे सांगत आठ लाखांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आठ आणि नऊ मे रोजी पिंपळे सौदागर येथे घडला.

या प्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल जोशी (वय 32, रा. लंडन इंग्लंड) आणि त्याची एक महिला साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Gurav : “मेरा लाईफ, मेरा स्वच्छ शहर” मोहिमेस प्रारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी निखिल जोशी याची जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनियल वेबसाईटवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांना सोने, आयफोन आणि परदेशी चलन इंग्लंड वरून पार्सल पाठवत असल्याचे सांगितले.

ते पार्सल घेण्याकरता कस्टम ड्युटी परदेशी चलन कन्व्हर्ट आणि भारतीय कर भरण्यास सांगत फिर्यादी यांची सात लाख 97 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत (Pimpale Saudagar) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.