Sangvi : मोबाईल कंपनीच्या टॉवरवरील साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – मोबाईल कंपनीच्या टॉवरवर लावलेले एक लाख 85 हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात आणि चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील व्हीआय कंपनीच्या टॉवरवर घडली.

Pimpri :  कुठलाही पुरस्कार शक्ती, ताकद, उर्जा देऊन जातो – पं. नंदकिशोर कपोते

दानिश रफिक शेख (वय 24, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर व्हीआय कंपनीचा टॉवर आहे. त्या टॉवरवरील टूजीचे एक कार्ड, फोर जीचे एक कार्ड आणि आरआरयुचे तीन नग असा एकूण 1 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सांगवी (Sangvi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.