Pimple Nilakh News : शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती हटवा; रयत स्वाभिमानी संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज : पिंपळे निलख (Pimple Nilakh News) येथील शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती हटवा, अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे रविराज काळे यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन ई-मेल द्वारे पिंपरी चिंचवड मनपा प्रशासक आणि आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. तसेच, लेखी निवेदन गुरुवारी ‘ड’ प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड (सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना ऋषीकेश कानवटे, अजय चव्हाण, ओमकार भोईर, नीरज सुतार इत्यादी उपस्थित होते

पिंपळे निलख येथील शहिद अशोक कामटे उद्यानात हत्ती बसवण्यात आला आहे. तो हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा. कारण येथे असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानास डायनासोर गार्डन या नावाने ओळखले जाते. त्याचे कारण तेथे असलेले हे विशाल विशाल शिल्प. मग त्या उद्यानास राजमाता जिजाऊचे नाव देण्याचा हेतू साध्य झाला का हा प्रश्न पडतो? फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी राजमाता यांचे नाव दिले हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच प्रमाणे पिंपळे निलख येथील शहिद अशोक कामटे उद्यानात देखील असाच हत्ती बसवण्यात आला आहे. यातील हत्तीचे अजून उद्धघाटन झाले नाही. हा हत्ती काढण्यासाठी ‘ड’ प्रभाग तीन ते चार वेळा जनसंवाद सभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

शहिद (Pimple Nilakh News) अशोक कामटे यांचा मान ठेवायचा असेल, तर हत्तीचे शिल्प काढण्यात यावे. नाही काढले तर समाजातील नागरिक पिंपळे निलख येथील उद्यानास कामटे यांच्या नावाने न ओळखता हत्ती उद्यान या नावाने ओळखले जाईल आणि हा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात काळे म्हणतात की, माझी आपणास कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर उद्यानातील हत्तीचे शिल्प हटवण्यात यावे. अन्यथा 14 डिसेंबर शहिद अशोक कामटे उद्यानासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

रयत स्वाभिमानी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
1) शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्तीचे शिल्प लवकरात लवकर हटवण्यात यावा.
2) उद्यानातील पथदिव्यांची संख्या वाढवण्यात यावी.
3) सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढवावी.

Talegaon Dabhade : एल अँड टी कंपनीतील कामगारांना मनसेचा पाठिंबा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.