Pimple Nilkh News: पिंपळे निलख कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’, कडक लॉकडाऊन करा- तुषार कामठे

पिंपळे निलख येथे 20 दिवसांपूर्वी 14 रुग्ण होते. सद्यस्थितीत 141 रुग्ण आहेत म्हणजेच 20 दिवसांमध्ये तब्बल 127 रुग्ण वाढले आहेत. पिंपलेनिळख कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपळेनिळख भागात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दाट लोकवस्तीतील वाढ चिंताजनक आहे. या भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपळे निळखमध्ये आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन इ-मेल करण्यात आले आहे. त्यात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, पिंपळे निलख येथे 20 दिवसांपूर्वी 14 रुग्ण होते. सद्यस्थितीत 141 रुग्ण आहेत म्हणजेच 20 दिवसांमध्ये तब्बल 127 रुग्ण वाढले आहेत. पिंपलेनिळख कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला आहे.

पालिका प्रशासनाने 13 ऑगस्ट 2020 पासून पिंपळेनिळख परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. नागरिक रस्त्याला लावलेले बॅरिकेट बाजूला करन ये-जा करत होते. पोलीस बंदोबस्त नसल्याने बाहेरील नागरिक फेरीवाले, भाजी विक्रेते फिरतात. पिंपळे निलख व विशाल नगरची मिळून जवळजवळ 80000 लोकसंख्या आहे. येथे कोरोना आणखी पसरल्यास परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाईल.

त्यामुळे पिंपळेनिलख परिसरात आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करावा. भाजीवाले, फेरीवाले यांना अटकाव करावा. येथील नोकरदार वर्गाला बाहेर जाण्यास प्रतिबंध करावा. लॉकडाऊन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे पालिका प्रशासनाला आदेश देण्याची विनंती नगरसेवक कामठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.