Pimple Saudagar : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन (Pimple Saudagar ) जॉब मधून अधिक पैसे मिळतील असा बहाणा करून ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून एका व्यक्तीची 15 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार ते आठ मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.
दीप सुरेश पांडे (वय 30, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित सिंग, जॉन डॅनियल, जास्मिन आदर्श आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका व्हाट्सअपच्या माध्यमातून फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यांना ऑनलाइन जॉब मधून एक्स्ट्रा इन्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांच्याकडून 15 लाख 96 हजार 485 रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत (Pimple Saudagar )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.