Pimple Saudagar: स्मार्ट पिंपळे सौदागरची कचराकोंडी; गृहनिर्माण सोसाट्यांमधील ‘ओव्हर फ्लो’ कचराकुंड्या रस्त्यावर

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या पिंपळेसौदार परिसराची कचराकोंडी झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये कचरा गाडी येत नाही. कुड्यांतील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी ‘ओव्हर फ्लो’ झालेल्या कचरा कुंड्या सोसायटीच्या गेटसमोर ठेवल्या आहेत. एका ठिकाणी तर हातगाडीवर कचराकुंड्या ठेवल्या आहेत. पावसाने कचरा ओला झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. कचरा संकलनासाठी नवीन गाड्या घेतल्या आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलण्याचे नियोजन बिघडले आहे.

  • शहरातील कचरा उचलला जात नाही. अनेक भागात घंटागाडी येत नाही. जागोजागी कच-याचे ढिग साचले आहेत. गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा कुड्यांतील कचरा कर्मचा-यांकडून उचलून टाकला जात नसल्याचे तक्रारी आहेत. त्यामुळे चिंचवड परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये कचरा पडून आहे.

पिंपळे सौदागर परिसरात गेल्या चार दिवसांपासून कच-याची गाडी आली नाही. त्यामुळे शिवम रेसिडन्सी, पुर्वा रेसिडन्सी आणि शिवशाही विश्व या सोसायट्यांमधील कचराकुंड्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी भरलेल्या कचरा कुंड्या गेटसमोर ठेवल्या आहेत. तर, काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्यात आली आहे.

  • एका ठिकाणी तर हातगाडीवर भरलेल्या कचराकुंड्या ठेवल्या आहेत. सकाळपासून पाऊस सुरु आहे. पावसाने कचरा ओला झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.