Dehuroad : सैनिकाने ऑन ड्युटी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – सैनिकाने ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास देहूरोड मिल्ट्री कॅम्प येथे घडली.

लान्स नाईक नरेंद्र सिंग (वय 35, रा. मिलिटरी कॅम्प, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या सैनिकाचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र सिंग हे मूळचे पंकबचे रहिवासी आहेत. देहूरोड मिल्ट्री स्टेशन येथे ते कार्यरत आहेत. दुपारी पावणे चारच्या सुमारास त्यांनी ड्युटीवर असताना स्वतःच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली.

त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.